Instagram Meta Glasses:
Meta चे Ray-Ban Meta Smart Glasses हे AI-सक्षम स्मार्ट चष्मे आहेत. त्याचा वापर करून लोक विविध प्रकारचे Reels तयार करत आहेत. त्यामध्ये कॅमेरा, मायक्रोफोन, स्पीकर्स आणि Meta AI असल्यामुळे वापरकर्ता फोटो, व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीम आणि व्हॉइस कमांड वापरू शकतो. पण अलीकडे काही क्रिएटर्सनी या चष्म्यांचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे Instagram ने कठोर भूमिका घेतली आहे.
आता एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय तुम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणार नाही. लोकांचा गैरफायदा घेणारा किंवा त्यांना त्रास देणारा Content Instagram वर ठेवला जाणार नाही. चोरीछुप्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करून Instagram वर पोस्ट करणे आम्हाला मान्य नाही. अशा कृतीला आळा घालण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलत आहोत, असे ॲडम मोसेरी यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय घडलं?
- अनोळखी लोकांचे त्यांच्या परवानगीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.
- महिलांशी "pickup" किंवा फ्लर्ट करण्याचे व्हिडिओ बनवत होते.
- दुकानातील कर्मचारी किंवा रस्त्यावरच्या लोकांवर prank करत होते.
- हे व्हिडिओ Instagram Reels वर पोस्ट करून लाखो व्ह्यूज मिळवत होते.
Instagram ने कारवाई का केली?
- Harassment (छळ)
- Bullying
- Consent शिवाय चित्रीकरण
- लोकांचा अपमान किंवा गैरफायदा घेणारा Content
हा Content Instagram च्या Community Guidelines चा भंग करणारा आहे. त्यामुळे असा Content हटवला जात आहे. तसेच वारंवार नियम मोडणाऱ्या अकाउंट्सवर बंदी घातली जात आहे.
कोणती कारवाई झाली?
- 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली किमान दोन लोकप्रिय अकाउंट्स बंद करण्यात आली.
- Harassing prank आणि pickup व्हिडिओ काढून टाकण्यात आले.
- भविष्यातही अशाच प्रकारच्या Content वर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
याचा सामान्य वापरकर्त्यांवर परिणाम होईल का?
- स्वतःचा Content तयार करत असाल.
- लोकांची परवानगी घेऊन शूट करत असाल.
- कोणालाही त्रास देत नसाल.
जर तुम्ही असला कोणताही Content बनवत नसाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. कारवाई मुख्यतः गैरवापर आणि छळ करणाऱ्या Content वर केंद्रित आहे.

إرسال تعليق